आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे गटाचा मेळावा:शेगावात खेडेकर, तर खामगावात जिल्हाप्रमुख भोजने कडाडले

खामगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्ष संपवण्याच्या हेतूने पक्षात फूट पाडण्याचे काम करण्यात आले. परंतु, शिवसेनेवर कितीही संकटे आली तरी संकटांना सामोरे जात त्याच्यावर मात करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत आहे. एकनिष्ठ शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेनेची पुनर्बांधणी करू, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांनी खामगाव येथे केले. तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा एकप्रकारे शिंदे गटाला इशारा सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी शेगावात दिला.

शिंदे गट वेगळा पडल्यानंतर शिवसेनेचे काय होणार, अशी चर्चा असतानाच जिल्ह्यात शिवसेनेने पुन्हा एकदा पुनर्बांधणीचे उद्दिष्ट समोर ठेवून मेळावे आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. एएनएस इन्फो व्हॅली खामगाव येथे शिवसेनेची बैठक आयोजित केली होती. तर शेगाव येथे विश्राम भवनावरही बैठक आयोजित केली होती. या वेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना भोजने व खेडेकर बोलत होते. खामगाव येथील बैठकीला मुंबईहून शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र कुडाळकर, उमेश सानप, प्रा. कोडे यांच्यासह विधानसभा प्रमुख हरिदास हुरसाड, शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रा.अनिल अमलकार, माजी शहर प्रमुख रवी गुजर, महिला आघाडी शहर प्रमुख भारती चिंडाले, कृउबास प्रशासक श्रीराम खेलदार, विजय बोर्डे, देविदास उमाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी पक्षाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. विविध विषयांवर चर्चा करून आगामी काळात शिवसेना बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान अनेक शिवसैनिकांनी, महिलांनी वसंतराव भोजने यांच्याकडे आपले शपथपत्र सादर केले. शेगाव येथील बैठकीला सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख अविनाश दळवी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदा बढे, संग्रामपूरचे रमेश झाडोकार, शेगावचे रमेश पाटील, उपशहर प्रमुख गजानन हाडोले, सुधाकर शिंदे, वासुदेव तायडे, नगरसेवक आशिष गणगणे, गुड्डू खंडारे, शुभम लोखंडे, रवी महाले, शहरप्रमुख शिवा तेजराव कराळे, अमोल चव्हाण, रमेश मुंडाले, धनंजय रिधोरकर, शैलजा ठाकरेसह शिवसैनिक उपस्थित होते. संघर्षाच्या काळात सर्व शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे व सदस्य नोंदणी अभियान राबवावे, असे आवाहन माजी तालुका प्रमुख प्रा. डॉ. अनिल अमलकार यांनी खामगाव येथे केले.

जास्तीत जास्त सदस्य निवडून आणा
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा. जिल्ह्यात शिवसेना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी पक्ष संघटन वाढवणे गरजेचे आहे. तसेच पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व भविष्यात खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेंद्र खेडेकर यांनी शेगाव येथे केले.

बातम्या आणखी आहेत...