आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून:वखराच्या पासने डोक्यात वार करून पत्नीचा खून

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पतीने रागाच्या भरात पत्नीवर धारदार वखराच्या पासने वार करून तिचा निर्दयीपणे खून केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नांद्राकोळी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र देशमुख आणि बीट जमादार परमेश्वर राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपी पतीस ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नांद्रकोळी येथील सुनीता गणेश जाधव (३७) ही महिला गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात शिलाई मशीनवर काम करत होती. काही वेळानंतर तिचा पती गणेश भागाजी जाधव (४५) हा वखराची पास घेवून घरात आला. त्यानंतर क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीत वाद निर्माण झाला. यावेळी पती गणेश जाधव याने रागाच्या भरात पत्नीच्या मानेवर आणि डोक्यावर धारदार वखराच्या पासने वार केले. हे घाव वर्मी लागल्याने पत्नी सुनीताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे ठाणेदार रवींद्र देशमुख आणि बीट जबाबदार परमेश्वर राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीस ताब्यात घेतले. वृत्त लिहिपर्यंत पोलिसात गुन्हा दाखाल नव्हता. मृत महिलेचा मुलगा विशाल जाधव तक्रार देण्यासाठी ग्रामीण पोलिस ठाण्यात होता. त्याच्याकडून पोलिस माहिती घेत होते.

बातम्या आणखी आहेत...