आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानरेंद्र लांजेवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या बुलडाणा शाखा अध्यक्षपदी प्रसिद्ध बालसाहित्यिक, कवी, कादंबरीकार, समीक्षक सुभाष किन्होळकर यांची निवड ३० एप्रिल रोजी झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली. त्याची आतापर्यंत कविता, कादंबरी, समीक्षा आणि बालसाहित्य कथा-कवितांची एकूण १३ पुस्तके प्रकाशित झालेली असून इयत्ता सातवीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकात नात्याबाहेरचं नातं हा पाठ समाविष्ट आहे. आपल्या मनोगतातून त्यांनी या पुढेही उत्तमोत्तम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल, असा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्रगती सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश साबळे होते. सभेच्या सुरुवातीला शिमला येथे पार पडत असलेल्या शाहू, फुले, आंबेडकर विचार प्रसार संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साबळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल प्रसिद्ध शायर डॉ. गणेश गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर विदर्भ साहित्य संघाची इतर कार्यकारिणी व पदाधिकाऱ्याची निवड या आधीचीच ठेवण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष सुभाष किन्होळकर, उपाध्यक्ष सुरेश साबळे, डॉ. माधवी जवरे, कोषाध्यक्ष अमरचंद कोठारी, सचिव वैशाली तायडे, सहसचिव वंदना ढवळे, प्रसिद्धी प्रमुख रविकिरण टाकळकर, सांस्कृतिक कार्य सचिव संदीप राऊत तर सदस्य म्हणून चंद्रशेखर जोशी, युवराज कापरे, विजय बावस्कर, प्रा.डॉ. संगीता पवार, सचिन कापसे, महेंद्र सोभागे, डॉ. लता बाहेकर यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक सल्लागार म्हणून डॉ. गणेश गायकवाड, प्रा.डॉ. एस. एम. कानडजे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, प्रा. डॉं अनंत शिरसाठ, प्रा. डॉ. कि.वा. वाघ, डॉ. विजया काकडे, शाहीना पठाण, डॉ. विजया काकडे, राम बारोटे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली तायडे यांनी तर आभार प्रदर्शन विजय बावस्कर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.