आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान:किसान योजना लाभार्थींनी 7 तारखेपर्यंत आधार लिंक करा : धानोरकर

दिग्रस24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पात्र लाभार्थींनी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक करणे अनिवार्य आहे. ७ सप्टेंबर २०२२ ही अंतिम तारीख असून केवायसी करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा त्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे अनुदान मिळणार नाही. तेव्हा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केले नाही त्यांनी लिंक करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे.

पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थींना वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळतात. चार महिन्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पण त्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे गरजेचे आहे. खात्याला आधार कार्ड सोबत लिंक करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर आहे. ज्या लाभार्थींनी केवायसी नसेल त्यांना अनुदान मिळणार नाही. तेव्हा त्या लाभार्थींनी बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...