आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांगण परिवाराने कोजागरी:रविवारी उजळणार मराठी‎ गझलांची कोजागरी‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नसे फक्त हा सोहळा अक्षरांचा,‎ नसे बहर हा फक्त पाना-फुलांचा,‎ मरुभूमी ही जीवघेण्या व्यथांची,‎ गजल हा असे कारवा वेदनांचा.‎ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे‎ यांच्या या मनाला स्पर्शून जाणार्‍या‎ गझलांच्या ओळी प्रमाणे‎ काळजाला भिडणाऱ्या गझलांची‎ मेजवानी घेवून दरवर्षी प्रमाणे याही‎ वर्षी मित्रांगण परिवाराने कोजागरी‎ मराठी गझलांचा कार्यक्रम‎ आयोजित केला आहे. सुप्रसिद्ध‎ गझल गायक करणसिंग राजपूत‎ यांची गझल या वेळच्या‎ कोजागरीचे प्रमुख आकर्षण आहे.‎ रविवार ९ ऑक्टोबर रोजी‎ येथील गर्दे वाचनालयाच्या‎ सभागृहात संध्याकाळी साडे सहा‎ वाजता आयोजित या कार्यक्रमास‎ रसिकांनी उपस्थित रहावे, असे‎ आवाहन मित्रांगण परिवाराने केले‎ आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम‎ निशुल्क आहे.

दरवर्षी कोजागरी‎ पौर्णिमा मराठी गझल कार्यक्रमांनी‎ साजरा करण्याची परंपरा मित्रांगण‎ परिवाराने मागील पाच वर्षांपासून‎ जोपासली आहे. यंदा कोजागरी‎ मराठी गझल मध्ये गझल गायन‎ आणि गझल मुशायरा असा‎ दुग्धशर्करा योग समाविष्ट आहे.‎ सुप्रसिद्ध गायक करणसिंग राजपूत‎ हे गझल गायन करणार आहेत. तर‎ गझल मुशायऱ्यामध्ये सतीश दराडे‎ बीड, गजानन वाघमारे यवतमाळ,‎ एजाज शेख भुसावळ यांची‎ जुगलबंदी रंगणार आहे. गझलकार‎ गोपाल मापारी यांच्या निवेदनात ही‎ रंगतदार मैफील होणार आहे.‎ गझलांच्या रेशीम वाटेवरून‎ सहप्रवासी होण्यासाठी रसिकांनी‎ अधिकाधिक संख्येने या मैफलीला‎ उपस्थित रहावे, असे आवाहन‎ मित्रांगण परिवाराच्या वतीने‎ चंद्रशेखर जोशी, राणा सुरेंद्र‎ ठाकूर, सुनीता प्रकाश जोशी, नरेन‎ राजपूत, आनंद संचेती,‎ डॉ.राजेश्वर उबरहंडे, डॉ.आशिष‎ खासबागे, कमलेश कोठारी,‎ मनोज बुरड, रणजितसिंग राजपूत,‎ विक्की चव्हाण, रितेश खडके‎ जैन, अभिजित निंबाळकर यांनी‎ केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...