आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शेगावातही कोश्यारी, भाजप प्रवक्त्याचा निषेध

शेगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी बेताल वक्तव्य केल्याबाबत सोमवारी शेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एमएसईबीचौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

यावेळी मनसैनिकांकडून रास्ता रोकोही करण्यात आला. पोलिसांनी मनसे सैनिकांना ताब्यात घेतले. आंदोलनात शहरप्रमुख अमीत देशमुख, तालुका प्रमुख रवींद्र उन्हाळे, विनोद टिकार, नारायण शेगोकार, परमेश्वर लहुडकर, मनीष जाणे, बाळू भोईटे, गोपाल लांजुळकर, रामेश्वर भारती, भास्कर खेळकर, राहुल धनोकर, अनंता वाघ, दिनेश मुडणीक, योगेश पवार, रामा इंगळे, बाळू भोईटे, गोपाल लांजुळकर, शे.अयुब, राजेश बेरभैया, रंगनाथ शिंदे, आकाश राहुडकर आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...