आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव:राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

देऊळगावराजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाची वेशभूषा साकारली होती. दहीहंडीचा उत्सव गोकुळ मथुरा वृंदावन द्वारकापुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

ओरिसामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीहंडी भंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. त्याच धर्तीवर शाळेमध्ये गोपाळकाला तयार करण्यात आला होता. सर्वांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी हत्ती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या जयघोषात करत मानवी मनोरा तयार करून दहीहंडी फोडली. याप्रसंगी राजलक्ष्मी स्कूलचे सचिव डॉ. रामप्रसाद शेळके, स्कूलचे प्राचार्य शर्मा, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...