आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्रम, चिकाटी, प्रयत्न हे जीवनाचे साफल्य; तेजेंद्रसिंह चौहान यांचे प्रतिपादन

खामगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रम चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न हे जीवनाचे साफल्य आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी लक्ष्मीनारायण ग्रुप चे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांनी केले.

१०६ हुतात्म्यांच्या बलिदानाची यशोगाथा सांगणारा व त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा दिवस त्यांना भावपूर्ण अभिवादन करित कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी लक्ष्मीनारायण ग्रुपचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य प्रा.राहुल अग्रवाल, मॉडेल स्कूल मुख्याध्यापक सुदाम जाधव यांच्यासह प्रा.पुष्पा जावरे ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अलकाश्री माळी यांनी तर संचालन विकास पल्हाडे व आभार प्रदर्शन प्रा. गौरव माने यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. ज्योती अग्रवाल, प्रा. शीतल राठी, प्रा.नयना पांडव, प्रा. वैशाली पुदागे, प्रा. प्रीती पमनानी, प्रा. मेहसरे, प्रा.कोमल उन्हाळे, प्रा.विनोद डाबरे, प्रा. शिवप्रसाद चव्हाण, प्रा. वरुणराज आटोळे, प्रा. अतुल पाटील, प्रा. किरणकुमार देवधर, आकाश खंडेराव, मॉडेल स्कूलच्या शिक्षिका साबा अंजुम, पायल ठाकूर, सोनाली तळोकार, स्नेहा गावंडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी नीलेश महाजन, सुलोचना गणोरकर, शोभा बोराडे, वंदना जाधव, नीलेश काटे व विद्यार्थी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...