आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन:पुण्यतिथी उत्सवानिमित्त शेगावात लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धन्य आज दिन संत दर्शनाचा’ श्री संत गजानन महाराजांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा आज गुरुवार एक सप्टेंबर रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत ‘गण गण गणांत बोते’, ‘जय गजानन’चा नामजप करत मोठ्या उत्साहात धार्मिक प्रथा परंपरेनुसार संपन्न झाला. शुक्रवार, २ सप्टेंबर मिती भाद्रपद शुक्ल ६ ला श्री हभप श्रीधर बुवा आवारे यांचे सकाळी सहा ते सात या दरम्यान काल्याचे किर्तन आणि नंतर दहीहंडी गोपाळकाला होऊन पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल. या निमित्ताने राज्यातील भाविक भक्तांची मांदियाळी संतनगरी शेगावात श्रींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी आज संत नगरीत जमली होती.मृदंगाच्या निनादात भक्तिमय वातावरणात संपूर्ण शेगाव गजानन मय झाले होते.

आजच्या या श्रींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी राज्यभरातून पन्नास हजाराच्या वर भाविक भक्त संतनगरीत दाखल झाले होते व त्यांनी श्रींच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.सुमारे ३२२ भजनी दिंड्यां चा सहभाग व १८५००वारकरी यांच्या सहभागाने संपूर्ण विदर्भ पंढरी गजाननाच्या नाम घोषाने दुमदुमली होती. श्रींच्या समाधी दर्शनासाठी सकाळी पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शन बारी मध्ये भाविक भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच या संत गजानन महाराजांच्या वचनावर श्रध्दा ठेवत गुरुवारी राज्यातील हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला हजेरी लावली.

बातम्या आणखी आहेत...