आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य लंपास:शासकीय धान्य गोदामातील साहित्य चोरट्याने केले लंपास ; अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल

मोताळा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मोताळा ते नांदुरा मार्गावर पंचायत समिती जवळ हिंगे यांच्या खोलीतील शासकीय धान्य गोदामाचे कम्प्युटर व साहित्य असा एकूण १० हजार ३०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना आज १४ जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांत अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील शासकीय गोदामाला २०१७ मध्ये एसेर कंपनीचा लॅपटॉप कम्प्युटर मिळाले होते. परंतु धान्य गोदामात विद्युत पुरवठा नसल्याने कर्मचाऱ्यांनी धान्य गोदामाला लागून असलेल्या विपुल हिंगे यांची खोली मागील पाच वर्षांपासून भाड्याने घेतली होती. दरम्यान, १३ जून रोजी गोदाम पालक अशोक हिवाळे यांनी दिवसभर लॅपटॉप संगणकावर काम करून रात्री जवळपास दहा वाजेच्या सुमारास त्यांनी खोली बंद करून घरी निघून गेले. दरम्यान, आज १४ जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गोदाम पालक हिवाळे यांनी खोलीवर जाऊन पाहिले असता खोलीचे कुलूप तुटलेले व गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता, टेबलवर ठेवलेले दहा हजार रुपये किमतीचे एसेर कंपनीचे लॅपटॉप कम्युटर, दोनशे रुपये किंमतीचे किबोर्ड व शंभर रुपये किंमतीचे माउस दिसून आले नाही. त्यामुळे कोणीतरी चोरट्याने खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लॅपटॉप कम्प्युटर व साहीत्य असा १० हजार ३०० रुपयांचा माल लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गोदाम पालक अशोक हिवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे व पोकॉ सुनील भवटे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...