आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतमाल लंपास:खरबडी शिवारातील गोदामामधून 67 हजारांचा शेतमाल लंपास ; सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली घटना

मोताळा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील खरबडी शिवारातील एका शेतातून शेतमाल व इतर साहित्य असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना आज ८ जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरबडी येथील बाळू उत्तम वाघ हे शिक्षक असून त्यांची खरबडी शिवारात गट क्रमांक ९४ मध्ये एक एकर शेती आहे. या शेतीत पोल्ट्री फॉर्म असून त्याला लागूनच गोदाम आहे. त्यामध्ये शेतातील माल व साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, ७ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बाळू वाघ हे नेहमीप्रमाणे गोदाम बंद करून घरी झोपायला गेले. आज ८ जून रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते गोदामावर गेले असता त्यांना गोदामाच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर वाघ यांनी गाेदामामध्ये जाऊन पाहिले असता थैल्यांमध्ये ठेवलेले १८ हजार रुपये किमतीची नऊ क्विंटल मका, २० हजार रुपये किमतीचा चार क्विंटल हरभरा, १३ हजार रुपये किंमतीची अडीच क्विंटल तूर आणी व्हर्रफुल कंपनीचे पाच हजार रुपये किमतीचे फ्रीज व रसवंतीच्या वापरासाठी असलेली तीन हॉर्सपॉवरची सात हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटार व साडेचार हजार रुपयांचे कोंबड्यांचे खाद्य व इतर सामान असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा माल चोरट्याने लंपास केल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर बाळू वाघ यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवुन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ नंदकिशोर धांडे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...