आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालय:भूमिअभिलेख कार्यालय दलालांच्या दावणीला

नांदुराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका भूमि अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. थेट कार्यालयात जाणाऱ्यांचे काम होत नसून तेच काम दलालांमार्फत केल्यास लवकर होते, असा अनुभव अनेक नागरिकांना येत असल्याने नांदुरा येथील भूमी अभिलेख कार्यालय डोकेदुखी ठरत आहे.

भूमिअभिलेख कार्यालयात नोंदी, मोजणी, वारस लावण्याचे अनेक प्रकरणे धूळ खात पडले आहेत. सामान्य नागरिक चकरावर चकरा मारत आहेत. या कार्यालयात गरीब शेतकऱ्यांसोबत व्यवस्थित बोललेही जात नसल्याने ते हतबल होऊन दलालांकडे जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...