आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्व. अनुराधाताई यांच्या स्मृती प्रित्यर्थ १ मे रोजी आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबिरात दोन हजाराहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी आठशे रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वीही वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करून गरजूंना मदत करण्याचे काम अनुराधा मिशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
दरम्यान, दृष्टीहिन रुग्णांना मिळालेल्या चष्म्याच्या दृष्टीतून सृष्टी दिसत असल्याचा आनंद रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसत होता.कार्यक्रमाचे आयोजन परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान येथे सोमवारी करण्यात आले होते. यावेळी मौनीबाबा संस्थानचे अध्यक्ष बल्लूसेठ सावजी, माजी अध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, वैजापूर येथील कैलास साखरे, नितीन भुसारी, विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, आत्माराम देशमाने, अतहरोद्यीन काझी तसेच रुग्णांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले की, २६ वर्षांपासून अविरतपणे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून तपासणी बरोबरच उपचारासाठी सातत्यपूर्ण आरोग्य विषयक विविध शिबिरांचे आयोजन अनुराधा मिशनच्या माध्यमातून करण्यात येते. सेवेचा वसा बाळगून रुग्ण सेवाभाव जपणे ही कर्मयोगी तात्यासाहेबांची शिकवण असल्याने ती अंगीकृत करून अविरतपणे पुढे चालवत असल्याचे बोंद्रे म्हणाले.
कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात या शिबिरांना खंड पडला होता. मात्र यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र तपासणी शिबिराचा तालुकाभरातून आलेल्या गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये २२५० रुग्णांच्या विविध नेत्र तपासण्या करण्यात आल्या, तर १४२५ रुग्णांची चष्मे वाटपाकरिता निवड करण्यात आली होती. त्यापैकी ८०० नेत्र रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनुराधा फार्मसीचे प्रा. डॉ. कैलास बियाणी, प्रा. डॉ. काळे, प्रा. डॉ. सचिन काळे, प्रा. कालवे, सराफ, नितीन देशमुख, दिलीप सोळंकी, किसन जाधव, प्रेमसिंग इंगळे, निबांजी डुकरे, संजय पाटील, विठ्ठल डुकरे, युवराज गंडे, हिवाळे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.