आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:समर्थ फार्मसी महाविद्यालयामध्ये ‘रोजगार संधी’ विषयावर व्याख्यान; समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी येथे मार्गदर्शन

देऊळगावराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी येथे शासकीय सेवेमधील रोजगार संधी याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख औषधी निरिक्षक गजानन घिरके, प्रा.प्रफुल्ल ताठे, विभाग प्रमुख प्रा. गोपालकृष्ण सीताफळे उपस्थित होते.

​प्रस्ताविकपर संबोधनात प्रा. ताठे यांनी घिरके यांची ओळख करुन दिली. जिद्द व मेहनत करुण एक आपल्या भागातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ति उच्च पदावर जाऊन चांगले कार्य करत असून भविष्यात येणाऱ्या नवीन पिढीला मार्गदर्शन करत आहे. याबाबत माहिती देऊन प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुण दिला. प्रमुख मार्गदर्शक घिरके यांनी नवीन फार्मसी महाविद्यालये शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय रोजगाराच्या उपलब्ध संधी व वेगवेगळ्या विभागाची माहिती दिली.

समर्थ फार्मसी विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या हिता करीता नवनवीन उपक्रम राबवत असते. संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे व प्राचार्य प्रफ़ुल्ल ताठे हे नेहमीच अशा उपक्रमाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत असतात. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये चांगली मेहनत घेऊन उत्तीर्ण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. भविष्यात विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास सदैव अग्रगण्य राहील असे आश्वासन घिरके यांनी दिले. सूत्रसंचालन प्रा. गोपालकृष्ण सीताफळे यांनी तर आभार प्रा. पवन नारखेडे यांनी केले. कार्यक्रमाकरता विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. नितीन शिंगणे, सुरेश कोल्हे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...