आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:"खरे संत कोण, ज्ञानेश्वर की भागेश्वर'' यावर‎ 27 एप्रिल रोजी बुलडाण्यात व्याख्यान‎

बुलडाणा‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"खरे संत कोण, ज्ञानेश्वर की‎ भागेश्वर'' यावर प्रा. शाम मानव यांचे‎ बुलडाणा येथे २७ एप्रिल रोजी‎ व्याख्यानाचे आयोजन करण्यात‎ आल्याची माहिती अखिल भारतीय‎ अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा‎ शाखेने दिली‎ ११ मार्च रोजी प्रा. शाम मानवाच्या‎ विदर्भात अकरा सभांचे आयोजन‎ करण्यात आले आहे. यातील एक सभा‎ बुलडाणा शहरात २७ एप्रिल रोजी‎ संध्याकाळी श्री शिवाजी विद्यालयात‎ होणार आहे. यावेळी अंनिसचे‎ पदाधिकारी व मराठा सेवा संघाचे डॉ.‎ मनोहर तुपकर यांनी ही सभा वैचारिक‎ मंथन असल्याचे सांगितले.

बैठकीला‎ डॉ. मनोहर तुपकर, प्रमोद टाले, दत्ता‎ शिरसाठ, गणेश निकम, भीमसेन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिराळे, संजय विखे, संजय खांडवे,‎ सुनील सपकाळ, उत्तमराव बाजड,‎ सुमित जाधव, जगन बाजड, आशिष‎ गवई, रामेश्वर तायडे, प्रा. गोपालसिंग‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राजपूत, गजानन पडोळ, सतीश‎ पाटील, राम सोनवणे, विवेक हिवाळे,‎ प्रा. माणिकराव गवई, रितेश पाटील‎ उपस्थित होते.‎

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन‎
छत्रपती संभाजी राजे बलिदान दिनाचे औचित्य साधून यावेळी मान्यवरांनी‎ राजांना अभिवादन केले. टाले यांच्या प्रयत्नातून शहरात मराठा इतिहास‎ संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.‎ यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राम सोनवणे‎ यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...