आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेविषयक शिबिर:श्री शिवाजी हायस्कूल येथे कायदेविषयक मार्गदर्शन

देऊळगावराजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश कंठे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सोनुने, तर प्रमुख उपस्थितीमध्ये देऊळगाव राजा न्यायालयाचे सहायक सरकारी वकील अॅड. अनिल शेळके, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डाखोरकर, सचिव अॅड. सलमान सय्यद, अॅड. मिनासे, अॅड. विघ्ने, अॅड. डोईफोडे, अॅड. सूनगत, अॅड. अशोक शेळके,अॅड. कापसे, अॅड. ठुमके,अॅड. पेटकर, अॅड. शहा उपस्थित होते.

यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता अनिल शेळके यांनी रॅगिंग अॅक्ट या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अॅड. पेटकर यांनी अंमली पदार्थ बंदी या विषयावर तर पोलिस उपनिरीक्षक यांनी मोटार वाहन कायद्यावर मार्गदर्शन केले. यानंतर अध्यक्षीय भाषण हे दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शैलेश कंठे यांनी केले. सूत्रसंचालन कुरणगळ यांनी तर आभार प्रदर्शन वकील संघाचे प्रवक्ता अॅड. अशोक शेळके यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य संजय देशमुख,पैठणे,कुरंगळ, डोईफोडे यांनी विशेष सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...