आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्वा रं पठ्या...:मराठवाड्याच्या लेकींनी विदर्भात येऊन गाजवला कुस्तीचा आखाडा

सोनोशी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुस्तीचा खेळ हा तसा पारंपारिक मर्दानी म्हणजेच पुरुषांचा खेळ आहे. असे असले तरी मात्र या खेळामध्ये मुलीही आपला सहभाग नोंदवत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या स्पर्धेत महिला आपले नाव उंचावत असतानाच ग्रामीण भागातही आता कुस्तीमध्ये मुलींचा सहभाग दिसत आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत मराठवाड्याच्या लेकींनी आपला सहभाग नोंदवून कुस्तीचा आखाडा गाजवला.

मराठवाड्याची वैष्णवी सोळुंके व रूपाली शिंदे यांनी सोनोशी येथे आयोजित कुस्तीच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आपली योग्यता उपस्थितांना दाखवून दिली. या दोन्ही मुलींनी मैदान गाजवून ग्रामीण मुलीही कुस्तीच्या स्पर्धेत कमी नाहीत, हे दाखवून दिले आहे. या दोन्ही मुली अवघ्या चौदा वर्षाच्या आहेत. कुस्ती खेळण्यासाठी त्या मैदानात उतरताच उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. मुलीही कुस्तीत प्रतिस्पर्ध्यांसाठी दोन हात करण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांचे डावपेच पाहून त्यांच्यावर बक्षीसांची खैरात करण्यात आली.

या स्पर्धेत वैष्णवी सोळुंके व रूपाली शिंदे यांनी कुस्तीमध्ये मुलावर मात करून बक्षिसे प्राप्त केली. ग्रामीण भागातील मुली कुस्तीमध्ये सहसा भाग घेत नाही. परंतु आता वैष्णवी आणि रुपाली यांच्या रूपाने कुस्तीच्या आखाड्यात मुलीही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. कुस्ती पुरुषांचा खेळ पण आता या खेळा मध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन हातात हात देऊन पुरुषासोबत महिलांची कुस्ती हा अनोखा प्रकार सोनोशी गावात पहावसाय मिळाला. येणाऱ्या काळात अजून मुली हळूहळू या स्पर्धेकडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...