आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:मलकापूर पांग्रा शिवारात बिबट्या! ; जेरबंद न झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात आज २ सप्टेबर रोजी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महसूल व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी परिसरात हजर झाले आहेत. तर सायंकाळी उशीरा पर्यंत रेस्क्यू टीम दाखल होणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. बिबट्या लवकर जेरबंद न झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मलकापूर पांग्रा शिवारात शेख रफिक शेख नवाज यांच्या शेतात बिबट्या दिसुन आला. बिबट्या दिसताच शेख रफिक व करण राठोड यांनी गावात फोन केले. वनाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती देण्यात आली. वन अधिकाऱ्यांना माहिती दिली असता हा भाग आमच्या हद्दीत येत नाही. आपण मेहकर टीमला कळवा असे सांगण्यात आले. मात्र आर. पी. शेळके हे बीबी येथील वनरक्षक घटनास्थळावर पोहोचले. रेस्क्यू टीम घाटबोरी येथे असून इकडे येण्यासाठी निघाली आहे. सायंकाळ पर्यंत पोहोचेल असे त्यांनी सांगितले. याचवेळी कर्तव्य बजावण्यासाठी नायब तहसीलदार व काही महसूल कर्मचारी मलकापूर पांग्रा भागात होते. बिबट्या संदर्भात त्यांना माहिती मिळताच त्यांनीही वन विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र वृत्त लिहीपर्यंत कोणतीही रेस्क्यू टीम येथे पोहोचली नव्हती. बुलडाणा वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते फोन उचलत नाहीत.

तर सिंदखेडराजा वन अधिकाऱ्यांच्या अख्त्यारित हा परिसर नाही. तर मेहकर येथील वन अधिकारी अजून घटनास्थळी पोहोचले नाहीत. यावरुन वन विभाग किती गंभीर आहे, याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. या बिबट्यामुळे हनवतखेड, हिवरा गडलिंग, पोफळ शिवणी, वाघाळा, नागझरी, दरेगाव, मलकापूर पांग्रा, आंबेवाडी, जनुना शिवारातील शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्याला लवकर जेरबंद करा : शेतकरी शेतात जाण्यास धजावणार नाहीत. परिणामी पिकांचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे या बिबट्यास लवकर जेरबंद करावे, अशी मागणी माजी पं. स. सभापती विनायक राठोड यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...