आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांत भितीचे वातावरण:भास्तन शिवारात बिबट्याचे दर्शन; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामाचे दिवस आहेत. त्यामुळे शेतकरी कुटूंबासह शेतात जात आहेत. मात्र तालुक्यातील भास्तन परिसरात नागरिकांना शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली.

भास्तन येथील गट क्र. ८२ मध्ये रमा मिरगे यांना शेतात पाणी देतांना एक बिबट्याची व दोन बिबट्याची बछडे निदर्शनास पडली. तसेच याच परिसरात २९ मे रोजी सुद्धा शेतकऱ्यांना याच ठिकाणी वाघ निदर्शनास पडला होता. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भास्तन शिवारात बिबट्याचा शोध घेतला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिसलेला वाघ नसून बिबट्या असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. परंतु पुन्हा बिबट्या दिसल्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत. या बाबीची वनविभाकडून दखल घेण्यासाठी भास्तन शिवारातील एका तरुणाने जिवाची पर्वा न करता व्हिडिओ बनवला आणि अमरावती, बुलडाणा येथील वन विभागाला दखल घेण्याबाबत निवेदन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...