आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व समाज बांधवांनी एकत्र येवुन सन उत्सव साजरे करावे व गावाची शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवावी, असे आवाहन सरपंच प्रतिभा इंगळे यांनी केले.
तालुक्यातील वरवट बकाल येथे आज ३ मे रोजी सकाळी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावच्या सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मस्जिद मध्ये जाऊन मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुस्लिम बांधवांसाठी ईद हा सण सर्वश्रेष्ठ असून या दिवशी आपसातील मतभेद विसरून गोरगरिबांना अन्न, धान्य, वस्त्र आदी दान करून हा सण साजरा करण्यात येतो.
ईद निमित्त मस्जिद मध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी सरपंच प्रतिभा इंगळे, पोलिस पाटील शुद्धोधन इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास बावस्कर, काँग्रेसचे शाम डाबरे, राष्ट्रवादीचे नारायण ढगे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सरपंच प्रतिभा इंगळे यांनी प्रथम मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना हा सर्वश्रेष्ठ महिना असून ईद हा सण खूप महत्त्वाचा आहे. अशाच प्रकारे येणारे सण, उत्सव सर्व धर्मांच्या मंडळींनी एकत्र येऊन साजरे करुया, असे आवाहन केले. कार्यक्रमाला सरपंच प्रतिभा इंगळे, उपसरपंच नंदा रौदळे, सदस्य संगीता इंगळे, प्रभा डाबरे, पोलिस पाटील शुद्धोधन इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास बावस्कार, श्याम डाबरे, नारायणा ढगे, राजू राठोड, संतोष टाकळकर, विजय इंगळे, शेख मोहम्मद भाई, शेख रहीम, शेख नईम, इमाम मिस्त्री, शे.आशपाक, शेख अनिस यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.