आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:निसर्गाशी मैत्री करत जीवन सुंदर करूय; ब्राह्मणवाडा येथील जि. प. प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशी वृक्षलागवड वाढावी आणि विद्यार्थ्याना एक अनोखा अध्ययन अनुभव मिळावा या उद्देशाने शाळेने १ मे पासून वर्ग १ ते ४ च्या ३५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोप लागवडीसाठी दिली. रोपांशी खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा येथे रोप संगोपनासाठी “एक मूल एक झाड” हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या आंबा, चिंच, जांभूळ, बदाम, नारळ, बेल, वड, पिंपळ, निंब इत्यादी वृक्षांच्या बी चे रोपण करून त्याचे संगोपन करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यानी आवडीने, स्वयंप्रेरणेने रोप संगोपनाची जबाबदारी स्विकारली हे विशेष! बीजारोपण कसे करतात ? बीजांकुरण कसे होते ? रोपाची वाढ कशी होते? रोपाची काळजी व संगोपन कसे करतात ? ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कृतीतुन, अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकता आली.

दररोजच्या आठवणीने रोपांना पाणी घालता-घालता त्या रोपाशी मुलांना लळा लागला आहे. पावसाळ्यात या रोपासमवेत वृक्षदिंडी काढून विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानपत्र देऊन त्यांचा पर्यावरण स्नेही पुरस्काराने शाळा व्यवस्थापन समिती तर्फे गौरव करणार आहे. “एक मूल एक झाड” या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षमित्र दिगंबर काकड, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गायकी व स्वाती पवार हे वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणा विषयीची गोडी निर्माण करणारा यासोबतच जिल्हाभरातील सर्व शाळांसाठी प्रेरणादायी ठरणारा उपक्रम ठरत आहे. उपक्रमाचे पालक वर्गातुनही कौतुक होत आहे.

पर्यावरणपूरक सहशालेय उपक्रम राबवणार
शालेय विद्यार्थ्यांना देशी वृक्षाचे बीजारोपण व वृक्षसंगोपनाची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती मिळावी या पर्यावरणपुरक हेतूने “एक मूल एक झाड” हा उपक्रम शाळेत राबविला. यासाठी शिक्षक डिगांबर काकड यांची प्रेरणा मिळाली. यापुढेही असेच पर्यावरणपूरक सहशालेय उपक्रम राबविण्याचा शाळेचा मानस आहे.
- गोविंद काशिनाथ गायकी, मुख्याध्यापक, जि.प.प्रा.शाळा ब्राह्मणवाडा.

बातम्या आणखी आहेत...