आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानगंगा अभयारण्य:रेल्वेच्या विद्युत खांबावर अडकलेल्या माकडास जीवदान

नांदुरा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलंब स्टेशनवरील रेल्वेच्या मुख्य विद्युत पोलवर अडकलेल्या माकडाला ट्रेंक्युलाईज बंदुकीने इंजेक्शन देवून वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूप खाली उतरवून जीवदान दिले. यासाठी काही काळ रेल्वेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. मुंबई-हावडा ही विद्युत रेल्वे लाइन बुलडाणा जिल्ह्यातून जाते. मंगळवारी दुपारी एक माकड जलंब रेल्वे स्टेशनवरील रेल्वेच्या मुख्य विद्युत खांबावर चढले. पोलवरील कैचीत त्याचा पाय अडकला. बराच वेळ होऊन ही त्याला निघता येत नव्हते.

त्यामुळे रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी त्रस्त झाले. याची माहिती खामगाव आरएफओला मिळाल्यानंतर वन विभागाचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. परंतु माकडाला सुखरूप वाचवणे त्यांच्यासाठी जोखमीचे होते. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती बुलडाणा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला दिली. माहिती मिळताच डीएफओ अक्षय गजभिये, एसीएफ रणजीत गायकवाड यांच्या आदेशाने रेस्क्यू टीम थोड्याच वेळात बचावाचे साहित्य घेऊन जलंब रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. सर्व प्रथम रेल्वे लाइनचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर माकडाला ट्रेंक्युलाईज केले. माकड बेशुद्ध झाल्यानंतर त्याला सुखरूप खाली उतरवले.

त्यानंतर या माकडाला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले. ही कारवाई रेस्क्यू टीमचे सदस्य संदीप मडावी, पवन वाघ यांच्यासह वन कर्मचारी गंगा वळवी, दीपक अडपे, भास्कर दाबेराव यांनी केली आहे. यासाठी त्यांना रेल्वे आणि जीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...