आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षी ठार:वीज पडून कळपीरा येथे बैलासह अनेक पक्षी ठार ; शेतकऱ्यांनी शेताची मशागतीला सुरुवात

मेहकर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उकाड्यामुळे हैराण झालेल्या तालुक्यातील नागरिकांना गुरुवारी मृगाच्या पावसाने दिलासा दिला आहे. या पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता. पावसाळ्याची चाहूल लागल्यामुळे शेतकऱ्यांनी शेताची मशागतीला सुरुवात केली आहे. प्रत्येक जण चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. त्यातच यंदा पावसाला लवकरच सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पावसाने सुरुवात करून दिली. तालुक्यातील कळपीरा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे बैल व पक्ष्यांची हानी झाली आहे. दरम्यान कळपीरा तेथे अरविंद इंगळे यांच्या शेतात ५ च्या सुमारास वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. तसेच झाडांवरील शेकडाे पक्षी ठार झाले आहेत. सोबतच वादळी वाऱ्यामुळे संजय तागडे, जनार्दन सुरडकर यांच्या शेतातील कोठ्यावरील टिनपत्रे उडाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...