आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:वीज पडून गोठ्याला आग; शेतकऱ्याचे नुकसान ; शेतीचे अवजारे व बियाणे जळून खाक

लोणारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देउळगाव कुंडपाळ येथील ज्ञानेश्वर सरकटे यांच्या गोठ्यावर ५ जून रोजी रात्री वीज पडून गोठ्याला आग लागली. या आगीत गोठ्यातील एक कालवड व शेतीचे अवजारे व बियाणे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ज्ञानेश्वर उत्त्तमराव सरकटे यांनी गट नंबर ४५३ मध्ये जनावरांसाठी गोठा बांधला आहे. या गोठ्यावर ५ जून रोजी रात्री ढगाळ वातावरणात विजांचा कडकडाट सुरू होवून वीज पडली. त्यामुळे गोठ्याला आग लागून. या आगीत गोठ्यात बांधलेली कालवड जळून ठार झाली. तर गोठ्यात असलेले स्प्रिकलर संच, ठिबक सेट, स्टार्टर, खत बियाणे, गुरांचा चारा व शेतीअवजारांचे नुकसान झाले. सरपंच डोंगरे, उपसरपंच सतीश राठोड, पोलिस पाटील ओमकार खोमणे, दत्तात्रय सरकटे यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. घटनेची माहिती मिळताच तलाठी जगन बारबुदे, ग्रामसेबक लक्ष्मण जायभाये यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...