आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चिखलीत आज रंगणार साहित्यिकांचा सोहळा

चिखली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुजन साहित्य संघाच्या वतीने आयोजित ‘बहुजन साहित्य संमेलन-२०२२’ उदया रविवार, २० नोव्हेंबर रोजी चिखली येथे होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी साहित्यिक मेहकर येथील किरण डोंगरदिवे राहणार आहे. तर संमेलनाचे उद्घाटन औरंगाबाद येथील साहित्यिक तथा पुरस्कारप्राप्त डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड राहणार आहेत.

या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले हे निमंत्रित असून, बारोमास कार साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख, डॉ. प्रतिमा इंगोले, के. एस्. अतकरे बापू, डॉ. आनंद अहिरे, डॉ. मनोज निकाळजे, जीवन कुळकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. विजयकुमार कोठारी आदिंच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

यावेळी “फुले-शाहू-आंबेडकर’ हे अत्यंत बहुमानाचे पुरस्कार काव्य प्रदेशातील स्त्री- या एकमेवाद्वितीय समीक्षा ग्रंथाच्या निर्मितीसाठी किरण शिवहर डोंगरदिवे, मेहकर, - भाई तुम्ही कुठे आहात? - या नाट्यकृती साठी डॉ. ऋषिकेश कांबळे, औरंगाबाद, वैचारिक लेखनास्तव डॉ.सतीश तराळ,अमरावती, आदिवासी क्षेत्रातील अहर्निश कार्यासाठी आनंद महाजन,अमरावती, मानवाधिकार क्षेत्रातील सेवेसाठी डॉ.मिलींद दहिवले,नागपूर, सामाजिक क्षेत्रातील सेवेसाठी डॉ. शिवचरण उज्जैनकर, मुक्ताईनगर,मनोरुग्णसेवेस्तव डॉ.नंदकुमार पालवे,पळसखेड सपकाळ, निरक्षर असतांना सुद्धा काव्यक्षेत्रातील भरीव कार्यासाठी विमल माळी,सोलापूर, साहित्य संमेलन क्षेत्रातील अखंड सेवेसाठी झेप संपादक डी.एन्.जाधव,औरंगाबाद,साहित्यातील ऐंशी पुस्तके लिहिणाऱ्या विमल वाणी,म्हसावद, अध्ययन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी डॉ.संघर्ष सावळे,मलकापूर, बाल - अनाथ सेवासमर्पणास्तव संतराज आंबेकर, जाळीचा देव, वृत्तपत्रीय सेवेसाठी संघपाल सिरसाठ, अकोला,शैक्षणिक क्षेत्रातील कठोर वाटचालीस्तव डॉ.राजकुमार कांकरिया,जळगांव आणि वैद्यकीय क्षेत्रातील गणमान्य कार्यासाठी डॉ.सावली राऊत,औरंगाबाद यांना प्रदान करण्यात येत आहेत.

तर मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री रेणू जोशी यांचे शास्त्रीय नृत्याविष्करण हे ही या आनंद यात्रेचे विशेष आकर्षण ठरणार असून संमेलनाच्या प्रारंभीची संविधान ग्रंथ दिंडी तथा त्यात सहभागी असणारे लोक-कलावंत हे ही लक्ष वेधून घेणारे ठरणार आहेत. असे या संमेलनाचे आयोजक ॲड. विजयकुमार कस्तुरे, शाहीर मनोहर पवार, बबनराव महामुने, ॲड. सर्जेराव साळवे, किसन पिसे, महेश वाधवाणी, तथा ज्ञानेश्वर पचांगे आदींनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...