आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना इफेक्ट:बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन,  7 जुलै ते 21 जुलै पर्यंत लॉक डाऊन पालकमंत्र्यांची घोषणा

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात 7 जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज येथील जिल्हा नियोजन सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

लॉकडाऊन दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सर्वच  दुकानांना परवानगी राहील. दुपारी 3 ते सकाळी 9 पर्यंत कडक कर्फ्यु असणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. बुलडाणा येथे स्वॅब टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच 10 जणांचा स्टाफ लागणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. आमदारांना रॅपिड अँटीजन टेस्ट किटसाठी 10 लाख रुपयांची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. जालना येथूनही स्वॅब टेस्ट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दुचाकीवर एकच जण बसेल, दुसऱ्यावर कारवाई होणार आहे.

0