आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अग्निपथ योजना रद्द करण्याची लोणार, संग्रामपूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

लोणार4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्नीपथ योजनेंतर्गत केवळ तुटपुंज्या प्रशिक्षणावर युवकांची सैन्यदलात भरती केली जाणार आहे. त्यामुळे अल्प प्रशिक्षित युवकांचे प्राण धोक्यात न आणता ही योजनाच रद्द करण्यात यावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, अग्निपथ योजना सैन्य दलासाठी योग्य नसून या योजनेत असंख्य त्रुटी आहेत. लष्कराची सैन्य भरती प्रक्रिया विस्कळीत करण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ चार वर्ष लष्करी सेवा दिल्यानंतर युवकांचे पुढील भविष्य अधांतरी असणार आहे. केंद्र शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून ही योजना अंमलात आणू नये. तसेच भविष्यात अल्प प्रशिक्षित युवकांचे प्राण धोक्यात आणू नयेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष सदानंद तेजनकर, डॉ.भास्कर मापारी, जिल्हा उपाध्यक्ष राजू काटे, संतोष बनकर, रवी बोडखे, कैलास सरकटे, संदीप शिंदे, गजानन वाठोरे, अक्षय मापारी, देवांग संचेती, अमोल सुलताने, अनंता शिंदे, दत्ता खंड, सोनू सांगळे, दीपक डव्हळे, राहुल इंगोले, संतोष नरवाडे, पवन मुरकुट, वैभव सुलताने, डिगांबर कायंदे, पवन राठोड, सुधाकर वाठोरे, गिरीश पोफळे, स्वप्नील सुर्यवंशी, आदिनाथ पोफळे, प्रेम घायाळ, आकाश घायाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...