आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी:जिल्ह्यातील 645  ई सेवा केंद्रावर अधिक दर आकारून होतेय लूट ; कागदपत्रे मिळवण्यासाठी ई सेवा केंद्रावर धावपळ

बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा सुरू होण्यास आठच दिवस बाकी असून पाऊस पडल्याने शेतीची कामेही आता वेगाने सुरु होणार आहेत. त्यामुळे ई सेवा केंद्राचा कारभारही वाढणार आहे. जिल्ह्यातील ६४५ ई सेवा केंद्रावर त्यामुळे दिलेल्या सेवाशुल्का व्यतिरिक्त जादा शुल्क आकारून लुट केली जाणार आहे. तेव्हा ई सेवा केंद्रांनी आपले शासनाने निर्धारित केलेले सेवा शुल्क दर्शनी भागात लावून नागरिकांना सेवा पुरवण्याची गरज आहे. लोकांनाही ई सेवा केंद्रावर न जाता घरूनच ई सेवेद्वारे आपले काम करता येणार आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनीही आर्थिक लूट होण्यापासून दूर रहावे. जिल्ह्यात नोंदणीकृत ई सेवा केंद्राची संख्या ६४५ इतकी आहे. यामध्ये ३२८ ग्रामपंचायत स्तरावर ई सेवा केंद्र आहेत. तर ३१७ शहरी स्तरावर ई सेवा केंद्र आहेत. ३९१ ई सेवा केंद्रांनी तीन महिन्यापर्यंत झिरो ट्रान्झॅक्शन दाखवले. म्हणजे एकही सेवा दिली नाही. त्यामुळे हे केंद्र बंद करण्यात आले आहे. जादा शुल्क आकारून जनतेची लूट केल्याच्या आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद व शेगाव येथील ई सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. ई सेवा शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश ई सेवा केंद्राचे फलकच दिसत नाही. त्यामुळे जी सेवा ३३ रुपये किंवा ५३ रुपयांत मिळावयास पाहिजे. ती सेवा १००, १५० रुपयांत मिळते. त्यातही ठरलेल्या वेळेत दाखले मिळण्याची शक्यताही कमीच असते. आता शाळा सुरु होणार असल्याने विविध दाखल्यांसाठी पालक ई सेवा केंद्रावर गर्दी करणार आहेत. शेतकरीही काही दाखले घेण्यासाठी ई सेवा केंद्रावर येणार आहेत. अशावेळी त्यांची लूट करण्याचे काम ई सेवा केंद्र चालक करणार आहे.

एनआयसी केंद्रावर कोणतीच माहिती नाही आधार केंद्र किती ठिकाणी आहेत याबाबत बुलडाणा जिल्ह्याची वेबसाइट बुलडाणा एनआयसी डॉट इन ( buldana nic.in) या वेबसाइटवर माहिती मिळत नाही. असाच प्रकार ई सेवा केंद्राबाबतही घडत आहे. आपल्या भागातील ई सेवा केंद्र कोणते आहे किंवा जिल्ह्यात किती ई सेवा केंद्र आहे. याची माहिती मिळत नाही. फक्त दिव्यांगांचे प्रमाणपत्राबाबतचा निवास उप जिल्हाधिकारी यांचे एक पत्र दिसून येत आहे.

महा ऑनलाइनवरही मिळू शकतात दाखले ई सेवा केंद्रावरच जावून दाखले मिळवण्याची गरज नाही. काही दाखले घरी बसूनही मिळवू शकत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. या mahaonlaine.gov.in या वेबसाईटवर जावे लागते. तेथे लॉग इन आयडी निर्माण करुन आपले डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. अशीही साइट असल्याचे अधिकारी सांगतात

असे आहेत दाखले मिळण्यासाठीचे शासकीय दर दाखला शुल्क कालावधी सातबारा किंवा ८ अ प्रति १ २३ रुपये ६० पैसे तत्काळ वय अधिवास प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे पंधरा दिवस जात प्रमाणपत्र ५७रुपये २० पैसे एकवीस दिवस शेतकरी प्रमाणपत्र ३३.६० पैसे पंधरा दिवस सर्वसाधारण प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे एक दिवस उत्पन्न दाखला ३३ रुपये ६० पैसे पंधरा दिवस नॉन क्रिमिलेअर ५७ रुपये २०पैसे एकवीस दिवस रहिवासी दाखला ३३ रुपये ६० पैसे पंधरा दिवस

बातम्या आणखी आहेत...