आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुईस ब्रेल जयंती‎:नॅशनल असोसिएशन फॉर द‎ ब्लाइंड तर्फे लुईस ब्रेल जयंती‎

बुलडाणा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा‎ शाखा, बुलडाणा संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम‎ चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोले‎ नेत्रालय बुलडाणा येथे अंधांचे प्रकाशदूत व‎ ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची जयंती‎ साजरी करण्यात आली.‎ सर्वप्रथम संस्थेचे कार्यकारी सदस्य‎ मांगीलालजी बुरड, सचिव‎ डॉ.व्ही.एस.चिंचोले व कोषाध्यक्ष दिलीप‎ नागरिक तसेच डॉ.शोन चिंचोले यांचे हस्ते‎ लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण‎ करून अभिवादन करण्यात आले. तसेच‎ संस्थेचे सचिव डॉ.व्ही.एस.चिंचोले यांनी‎ लुईस ब्रेल यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात‎ माहिती सांगितली.

लुईस ब्रेल यांचा‎ अपघातामुळे आलेल्या अंधत्वामुळे खचून न‎ जाता त्यांनी आपल्या बोटाच्या स्पर्शाने वाचली‎ जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी‎ ज्ञानाचा प्रकाश खुला केला. मात्र, डोळ्याने ते‎ अंध असले तरी त्यांची बुद्धी तल्लख होती.‎ परीक्षेमध्ये ते नेहमीच चांगली कामगिरी‎ करायचे. त्यांनी अथक परिश्रम आणि‎ जिद्दीच्या जोरावर ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ‎ ब्लाइंड युथ’ येथे पुढील शिक्षण घेतले. २००९‎ साली लुईस ब्रेल यांच्या जन्माला दोनशे वर्ष‎ पूर्ण झाल्याबद्दल भारत सरकारने त्यांच्या‎ नावाचे खास तिकीट प्रकाशित केले होते,‎ अशी माहिती यावेळी मान्यवरांनी दिली. या‎ कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, पदाधिकारी,‎ कर्मचारी वैष्णव तसेच चिंचोले नेत्रालयाचे‎ कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सचिव‎ डॉ.व्ही.एस. चिंचोले यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...