आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुसरबीड स्थानिक नारायणराव नागरे महाविद्यालयामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित राष्ट्रीय सेवा योजना विभाग दुसरबीड व पशू वैद्यकीय उपविभाग दुसरबीड यांच्या संयुक्त विद्यमाने लम्पी लसीकरण शिबीर दत्तग्राम पिंपळगाव कुडा येथे २४ सप्टेंबर रोजी पार पडले. २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन असल्यामुळे त्या निमित्ताने जनावरांचे लसीकरण शिबीर आयोजित केले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रवी निकम व पिंपळगाव खुट्टा येथील सरपंच वैजनाथराव कुडे, प्रतिष्ठित नागरिक खुशाल नाना जाधव व नागरिकांची उपस्थिती होती.
दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी तथा प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनी गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या गावांमध्ये लम्पी लसीकरण मोहीम राबवून जनावरांची काळजी घ्यावी. समाजाचे उत्तरदायित्व म्हणून विद्यार्थ्यांनी सेवा संस्कार अंगी बाळगावा. नैसर्गिक आपत्तीशी संघर्ष करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण असावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गावातील सर्व गुरांचे लसीकरण करण्यात आले. डॉ.रवी निकम यांनी लम्पी या साथीच्या आजाराची लागण झालेल्या पशूंचे तात्काळ लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयातील डॉ.गणेश घुगे, प्रा. शेख युनुस, प्रा. हरकळ,गजानन मुंडे,गजानन राठोड, अनिल गायकवाड,अनिल रानमले, रंगनाथराव जाधव, विकास वाघ, दिनकर घोरपडे, जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.