आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:एम. ई. एस. विद्यालयात शिक्षक दिन साजरा

धामणगाव बढेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एम.ई. एस.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये एक दिवसाकरिता विद्यार्थीच शिक्षक, मुख्याध्यापक बनले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एम.पी.शेले, चांदोरे, राठोड, व्ही.एस. वानखडे, कोल्हे यांच्या हस्ते पूजन केले. मुख्याध्यापकाची भूमिका वरद क्षीरसागर, उपमुख्याध्यापक प्रज्ज्वल जंगाळे तर पर्यवेक्षक पायल जाधव यांनी बजावली.

तर राणू बोरसे या विद्यार्थिनीने मार्गदर्शन केले. यावेळी आर.एम.चव्हाण, खुशी चव्हाण, आनंद लहासे, वेदिका रत्नपारखी, मनस्वी भोरे, तेजश्री गोराळे, वैष्णवी आसने, मानसी मोधे, पूनम पठ्ठे,वैष्णवी मख, वेदिका मोरे,गौरव हिवाळे, भाग्यश्री इंगळे, ममता बढे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पी.आर.डाबेराव, नारखेडे, जे.एस.पाटील, ए.पी.व्यवहारे, जी.व्ही.जुनारे, पी.आर.बोरसे आदींची उपस्थिती होती. संचालन श्रेया लहासे, विशाखा शहाणे तर आभार आराधना घोंगडे या विद्यार्थिनींनी केले.

बातम्या आणखी आहेत...