आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:एम. एस. जी. इंग्लिश स्कूलमध्ये‎ सावित्रीबाई फुले यांना अभिवादन‎

शिरपूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मातोश्री शालिनीताई गवळी‎ इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले‎ यांची १९२ वी जयंती उत्साहात‎ साजरी करण्यात आली.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदना‎ सुर्वे, तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील‎ सामाजिक कार्यकर्ते कैलास राऊत,‎ संतोष बाविस्कर, कपिल भालेराव,‎ नारायण काळे, स्वप्निल देशमुख‎ यांची उपस्थिती होती.‎ भारतातील पहिल्या शिक्षिका,‎ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची‎ जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची‎ वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती‎ सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान‎ असल्याचे उद्गार अध्यक्षीय‎ भाषणातून सुर्वे यांनी व्यक्त केले.‎

आरती गायकी, आयुषी इरतकर,‎ अंकिता हंगे, अक्षरा भालेराव,‎ परिदी मुगवानकर, आरुषी इरतकर,‎ देवयानी इरतकर, अमृता‎ गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले‎ यांची वेशभूषा, तर क्रांतीसूर्य‎ महात्मा फुले यांची वेशभूषा‎ राजवीर सुर्वे, अभिषेक जाधव,‎ सार्थक गडदे, गणेश देशमुख या‎ विद्यार्थ्यांनी केली होती. राजश्री‎ कपिल भालेराव, अक्षरा राजगुरू,‎ श्रुती चांगाडे, आरुषी इरतकर,‎ गायत्री भालेराव, आरती गायकी,‎ श्रावणी घिरके, परिदी मुगवानकर,‎ अभिषेक जाधव, सार्थक गडदे,‎ ओम देशमुख, कृष्णा जटाळे,‎ चैतन्य टोनचर, आर्यन गायकवाड‎ या विद्यार्थ्यांनी भाषण केले.‎ सूत्रसंचालन रेखा देशमुख यांनी‎ केले, तर आभार नारायण काळे‎ यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...