आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिवत पूजाअर्चा:महालक्ष्मी उत्सवाची भक्तिभावाने सांगता ; उत्सवामुळे घरोघरी मांगल्याचे वातावरण

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दिवसांपासून घराघरात सोन्या-मोत्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण ज्येष्ठा गौराई (महालक्ष्मी) चे ५ सप्टेंबर रोजी मोठ्या भक्ती भावात विसर्जन करण्यात आले.गणेशोत्सवा सोबतच संपूर्ण राज्यात गौरीच्या सणाला मोठे महत्व आहे. शहरासह ग्रामीण भागातही असंख्य भाविकांच्या घरी ३ सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदात धन धान्याच्या आणि सोन्या मोत्याच्या पावलांनी ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले होते. विधिवत पूजाअर्चा करून गौरीची स्थापना करण्यात आली होती. गौरी आणणे, तिला सजवणे, त्यांना नेवैद्य दाखवून त्यांची मनोभावे पूजा करणे, हा सोहळा एक वेगळाच असतो. या उत्सवामुळे घरोघरी मांगल्याचे वातावरण पसरले होते. या उत्सवा निमित्त घरोघरी आपापल्या पद्धतीने गौरींसाठी सजावट करण्यात आली होती. परंतु काही सजावट इतरांपेक्षा आगळीवेगळी ठरते तशीच सजावट शहरातील विविध घरांमध्ये करण्यात आली होती. पहिल्या दिवशी आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन व जेवण तर तिसऱ्या दिवशी ५ सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदात गौराईचे विसर्जन करण्यात आले. यावेळी वातावरणात उत्साह दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...