आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री शिक्षण:जिजाऊ-सावित्रीच्या रूपात अवतरली महालक्ष्मी; विविध समस्यांवर जागृती

मलकापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक शौर्य आणि संस्काराची जननी तर दुसरी शिक्षणातून स्त्री उद्धारनी, इथे जिजाऊ-सावित्रीच्या रूपात अवतरली गौराई. राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले स्वराज्य आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्याग व परिश्रमांतून सुरू झालेले स्त्री शिक्षणाचे कार्य हे त्यांच्यातील दैवी शक्तीचाच प्रत्यय घडवते. म्हणून या दोन्ही माऊलींना वंदन करण्याच्या हेतूने स्थानिक लक्ष्मीनगर परिसरातील रेणुका भुजबळ यांनी यंदाच्या गौरी पूजनानिमित्त जिजाऊ व सावित्रीबाईंच्या रूपातील महालक्ष्मीचे पूजन व नेत्रदीपक सजावट साकारली आहे.

यात छत्रपती शिवरायांना संस्कार, स्वाभिमान व स्वराज्य निर्मितीसाठी अखंड प्रेरणा देणाऱ्या जिजाऊंमधील असामान्य कर्तृत्व जाणवते तर समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षणाचा वसा घेत पहिली मुलींची शाळा सुरू करून समाजक्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाईंचा अद्वितीय त्याग दिसून येतो.

गौराईच्या सणात थोडे वेगळेपण दर्शवणारा देखावा साकारताना भुजबळ यांनी नारी शक्तीची विविध रूपे व महिलांच्या अनेक कर्तबगारीचा उल्लेख आपल्या सजावटीतून केला आहे. त्यातून प्रत्येक महिलेने जिजाऊ-सावित्रीचा वारसा चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तर नक्कीच तिच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती उभी राहते. त्यांच्या देखाव्यातून स्त्री ही डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, पोलिस, अंतराळाला गवसणी घालणारी विरांगणा, देश चालवणारी राज्यकर्ती, घर चालवणारी, मुला-बाळांना शिक्षित-सुसंस्कारीत करणारी, प्रेम देणारी माता, गृहिणी अशा शेकडो क्षेत्रातील हजारो जबाबदाऱ्या यशस्वितेने सांभाळत असल्याचे दर्शवण्यात आले. सोबतच अनेक सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करणारे फलक देखील त्यांनी दर्शवले आहे. या देखाव्याचे कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...