आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील अनेक वर्षापासून शहरातील विश्वकर्मा मंदिर येथे प्रभु विश्वकर्मा प्रगट दिन उत्सवाची परंपरा आहे. तीन दिवसीय हरिनाम व गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा पार पडला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मागील २ फेब्रुवारी रोजी धर्म ध्वजा रोहन विश्वकर्मा संस्थानचे ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव सुर्वे व मधुकर सुरुशे यांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत करण्यात आले. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी प्रमोद राऊत, आदिनाथ सुरुशे यांनी सपत्नीक प्रभू विश्वकर्मा मूर्तीला महाभिषेक व महाआरती केली.
त्यानंतर प्रभु विश्वकर्मा कथासार वाचन होऊन महाआरती करण्यात आली. गजानन विजय ग्रंथ पारायण झाले. श्रीहरी कीर्तनाचा कार्यक्रम सध्याकाळी पार पडला. त्या नंतर रात्री भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला. तीन दिवस कीर्तनाची सेवा हभप शीतलताई झगरे, हभप गिरधर महाराज कव्हळेकर यांनी दिली. हभप गजानन महाराज लोणकर यांचा काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर आ. डॉ. संजय रायमूलकर, माधव जाधव यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाचे वाटप करण्यात आले. या वेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तीन दिवसीय कार्यक्रमासाठी कीर्तनाला श्री खंडेराज बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था संचालित अनाथ आश्रम साब्रा यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विश्वकर्मा संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अनाथ मुला-मुलींची कीर्तनाला साथ संगत प्रभु विश्वकर्मा प्रगट दिन महोत्सवात तीन दिवसीय कीर्तनाला साब्रा येथील अनाथ मुला-मुलींची साथसंगत लक्षवेधी ठरली. हभप सहदेव महाराज ठोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अनाथ मुले शिक्षण घेत आहेत. याच आश्रमामधील मुलगी शीतलताई झगरे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. आश्रमातील सोहळ्याला अनेकांनी आपापल्या परीने मदत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.