आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:महाराणा प्रताप हे पराक्रम, अखंडतेचे प्रतीक; आमदार राजेश एकडे यांचे प्रतिपादन

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतीसूर्य महाराणा प्रताप पराक्रम व अखंडतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश एकडे यांनी केले.

वाकोडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत महाराणा चौक बोदवड रस्ता येथे महाराणा प्रताप यांची ४८१ वी जयंती ९ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. जयंतीनिमित्त आ.राजेश एकडे यांनी आपल्या स्वनिधीतून आठ लाख रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देऊन आपल्या मतदारसंघातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रवाशी निवारा मंजुरी करून त्या प्रवाशी निवाऱ्याला महाराणा प्रवाशी निवारा असे नाव देऊन, रितसर व विधिवत भूमिपूजन करून खऱ्या अर्थाने भारत मातेच्या या वीर पुरूषाला आदरांजली वाहिली.

यावेळी समाज भूषण रमेशसिंह राजपूत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी डॉ.अरविंद कोलते, अॅड. साहेबराव मोरे, संतोष रायपुरे, मंगलसिंह राजपूत, श्याम राठी, मंगला पाटील, बंडू चौधरी, राजू पाटील, हेलोडे, श्यामसिंग गौर, संजयसिंग ठाकूर, विलास खर्चे यांच्यासह समाज बांधव व जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र राजपूत यांनी तर आभार प्रदर्शन अशोकसिंग राजपूत यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...