आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना नियमांचे उल्लंघन:भाजप आमदार श्वेता महालेंसह 35 जणांवर गुन्हा दाखल, शिवजयंतीनिमित्त काढण्यात आला होता बाईक मोर्चा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह 35 जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी बाईक रॅली आयोजित केल्याचा आरोप आमदारावर आहे. यात सहभागी असलेल्यांपैकी कोणीही मास्क लावला नाही किंवा सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळले नाहीत. आमदाराव्यतिरिक्त ज्या लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे ते शिवजयंती समितीशी संबंधित होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत, मात्र राज्यात अजूनही महामारी कायदा लागू आहे. या अंतर्गत गर्दीपासून दूर राहणे, मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे असे नियम लागू आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात ही रॅली काढण्यात आली. याबाबत श्वेता महाले म्हणाल्या, 'आमची बाईक रॅली शांततेत पार पडली. आम्ही जिजा मातेच्या मुली आहोत, शिवजयंती साजरी केल्याबद्दल आमच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही असे पुन्हा पुन्हा करत राहू.'

या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी श्वेता महाले आणि अन्य 35 महिलांविरुद्ध भादंवि कलम 188, 269 आणि 270 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच महामारी कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत कोविडचे सर्व नियम शिथिल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांनी कलम 144 अद्याप हटवलेले नसल्याने रॅलीलाही परवानगी नाकारण्यात आली होती.

भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला होता
पुण्यातील एका लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल केला होता. याआधीही महाराष्ट्रातील पुणे शहरातील भाजप आमदाराच्या लग्नात सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन झाले होते. अशा परिस्थितीत, कोरोना महामारीच्या काळात या विवाह सोहळ्यात शेकडो लोक उपस्थित होते आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांसह लोक मास्कशिवाय दिसत होते.

बातम्या आणखी आहेत...