आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 मे:विदर्भ महाविद्यालयात महाराष्ट्र; कामगार दिन साजरा

बुलडाणा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विदर्भ महाविद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. पी. डी. हुडेकर हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रल्हाद धांडे उपस्थित होते. याप्रसंगी राजेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका व इतिहास विभाग प्रमुख डॉ. संगीता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रल्हाद धांडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. त्यानंतर प्रा. डॉ. संगीता पवार यांनी कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे व त्यांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी काही योजनांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर प्राचार्य डॉ. हुडेकर यांनी शेतकरी व कामगार यांच्या मेहनतीवर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीचे मूल्य झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सागर दांदडे यांनी तर व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. मुनेश्वर जमाईवार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. वैभव वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला डॉ.लक्ष्मण शिराळे, प्रा. नीलेश राऊत, प्रा.सीमा काळने, व्ही. एस. गाडेकर, वाय. टी. गायकवाड, क्षीरसागर, वारे, इंगळे, मोरे, उबरहंडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...