आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्साहात:महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी‎

देऊळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजा‎ येथील समर्थ कृषी महाविद्यालयात‎ राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा‎ गांधी आणि लालबहादूर शास्त्री याच्या ‎ ‎जयंती निमित्त खेड्याकडे चला या‎ महात्मा गांधीजींच्या विचारानुसार समर्थ‎ कृषी महाविद्यालयातील कृषी तज्ञांनी ‎ ‎ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन‎ शेतकऱ्यांशी संवाद साधला.‎ याप्रसंगी प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी‎ महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री‎ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार‎ अर्पण केले. गावातील प्रगत शेतकऱ्यांशी‎ संवाद व्हावा या अनुशंगाने एक दिवसीय शिवार फेरीचे आयोजन महाविद्यालया‎ कडून करण्यात आले होते, त्यामध्ये‎ सिनगाव जहागीर येथे वनस्पती रोग‎ शास्त्र विभागाचे प्रा. शुभम काकड यांनी‎ ऍझोला उत्पादन तंत्रज्ञाना बद्द्ल माहिती‎ सांगितली. तर कृषिशास्त्र विभागाचे प्रा.‎ अरविंद देशमाने यांनी कीटक नाशकांच्या अति वापरामुळे आरोग्यावर‎ होणारे दुष्परिणाम सांगत सेंद्रिय शेती‎ शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन‎ केले.

तसेच कृषी अर्थशास्त्र विभागाचे‎ प्रा. देवानंद नागरे यांनी गावातील आदर्श‎ शेतकरी बद्रीनाथ डोईफोडे यांच्या मिरची‎ या पिकाचे बीज उत्पादन करत‎ असलेल्या नेट शेडला भेट देऊन बीज‎ उत्पादन प्रक्रियेबद्दल माहिती घेतली,‎ तसेच पांगरी माळी येथे विस्तार शिक्षण‎ विभागाचे प्रा.मोहजितसिंह राजपूत यांनी‎ नामदेव वाघ यांच्या नेट शेडमध्ये मिरची‎ व टमाटे बीज उत्पादनाबाबतची‎ यशोगाथा जाणून घेतली. तर‎ कीटकशास्त्र विभागाचे प्रा मंगेश धांडे‎ यांनी कपाशी या पिकावरील कीटक व‎ त्यांचे नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती‎ शेतकऱ्यांना दिली. कार्यक्रमाला प्रा.‎ किरण ठाकरे, प्रा. विजय पवार, प्रा.‎ श्वेता धांडे, प्रा. सीताबाई ढाकणे, प्रा.‎ शिवकन्या दरेकर, प्रा. सोनाली इंगळे,‎ संजय लाड उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...