आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदची हाक:महाविकास आघाडीतर्फे आज मेहकर बंदची हाक

मेहकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये राज्यपाल, विविध मंत्री, सत्ताधारी पक्षातील नेते सातत्याने करत असून या विरोधातील जनतेचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मोर्चा व मेहकर बंदचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतच्या नियोजनासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी अॅड. अनंतराव वानखेडे, देवानंद पवार, प्रा. आशिष रहाटे, किशोर गारोळे, कैलास सुखदाने, विलास चनखोरे, नारायण बळी, संदीप ढोरे, सागर पाटील आदी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे इतर मंत्री, आमदार अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. यामुळे जनतेत क्रोध, आक्रोश आहे म्हणून तो व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी, १६ डिसेंबर रोजी मेहकर बंद व त्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता शहरातून मोर्चा निघणार असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे व आपापली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन महाविकास आघाडी व मित्रपक्षांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...