आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपुष्यामृत आज:1500 वर्षांत प्रथमच 10 शुभ योगांचा महायोग, या मुहूर्तावर प्रत्येक कार्य शुभ आणि फलदायी

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा दिवाळी २४ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. याच्या बरोबर दोन महिने आधी म्हणजे आज गुरुवारी (२५ ऑगस्ट) दुर्लभ गुरुपुष्यामृत योग आहे. दुर्मिळ यासाठी की आज १० शुभ योग तयार होत आहेत. दीपावलीच्या दोन महिने आधी शुभ कार्याच्या प्रारंभासाठी ही महत्त्वाची तिथी म्हणजे वरदान आहे, असे ज्योतिषी मानतात.

२५ ऑगस्टला दश महायोगाचा असा दुर्मिळ योगायोग गेल्या १५०० वर्षांत घडला नव्हता. सूर्योदयाला गुरुपुष्यामृत योग सुरू होईल. या महामुहूर्तावर प्रत्येक प्रकारचे शुभ कार्य लाभदायक, शाश्वत आणि फलदायी होईल. या दिवशी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन कामाची सुरुवात, वाहने, दागिने, कपडे आणि इतर गोष्टींची खरेदी करण्याचे अक्षय फायदे मिळतील. यासोबतच घरगुती आणि कार्यालयीन वापरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे देखील शुभ राहील.

या दिवशी सूर्य सिंह राशीत, चंद्र कर्क राशीत, बुध कन्या राशीत, गुरु मीन राशीत आणि शनी मकर राशीत असेल, असे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट सांगतात. अशा प्रकारे पाच ग्रह आपापल्या राशीत राहतील. हे खूप शुभ असेल. यामध्ये शनी आणि गुरू स्वतःच्या राशींमध्ये असल्यामुळे या संयोगाचे शुभ फळे आणखी वाढतील. कारण पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आणि देवता गुरू आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये ग्रहांची अशी स्थिती निर्माण झालेली नाही. पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्रा सांगतात की, गुरुवारी पुष्य नक्षत्रासोबत गुरू आणि शनी हे दोन्ही ग्रह आपापल्या राशीत असल्याने या संयोगात केलेल्या कामात यश निश्चित आहे.

या योगावरील खरेदीचा दीर्घकाळ फायदा
बनारस हिंदू विद्यापीठाचे प्रा. विनय पांडे म्हणाले की, पुष्य नक्षत्र हे चंद्राच्या राशीत येते आणि गुरुवार हा भगवान ऋषिकेश म्हणजेच विष्णूचा दिवस आहे. त्यामुळे या योगावर खरेदी केल्यास दीर्घकाळ फायदा होईल.

गुंतवणूक, व्यवहारासाठी हा महिना अतिशय शुभ
काशी विद्वत् परिषदेचे प्रा. रामनारायण द्विवेदी म्हणाले, या दिवसांत खरेदी अत्यंत शुभ असते. चातुर्मासात फक्त शुभ कार्ये होत नाहीत, पण गुंतवणूक, व्यवहार व नवी सुरुवात करण्यासाठी हा महिना शुभ मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...