आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:महिलांना मुख्य निर्णय प्रक्रियेत आणण्याचे काम महिला मोर्चा करणार ; चित्रा वाघ यांचे आश्वासन

सिंदखेडराजा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या काळात महिलांवर मोठे अत्याचार झाले. मात्र घरी बसून ऑनलाइन काम करणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारने याची किंचितही दखल घेतली नाही. मात्र आता आपले सरकार आले आहे. त्यामुळे महिलांनो चिंता करायचे कारण नाही. महिला आता सुरक्षित आहेत. महिलांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सुरू आहे. भविष्यात महिलांना मुख्य निर्णय प्रक्रियेत आणण्यासाठी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने काम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर चित्रा वाघ यांनी सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता माँ जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन घेऊन सुरुवात केली. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे सरकार ऑनलाईन होतं त्यांना सामान्य जनतेशी काही एक घेणे नव्हते. मात्र आता हे आपलं सरकार आलं आहे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महिलांना सन्मानाची वागणूक मिळत आहे. येणाऱ्या काळात लोकसभेच्या ४०० आणि विधानसभेच्या २०० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल आणि त्यात महिलांचा मोठा वाटा असणार असल्याचा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजक विनोद वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष सिंधू खेडेकर यांनी विचार मांडले. माजी आमदार तोताराम कायंदे, माजी खासदार सुखदेव काळे, माजी नगराध्यक्ष नंदाताई मेहेत्रे, शहराध्यक्ष विष्णू मेहेत्रे, डॉ. गणेश मांटे, महिला शहराध्यक्षा प्रिया केळकर, महिला तालुकाध्यक्ष अनिता शिंगणे, अॅड. संदीप मेहत्रे आदी उपस्थित होते. यावेळी देऊळगाव राजाचा नगरसेविका पल्लवी वाजपे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सूत्रसंचालन रोहित म्हस्के तर आभार प्रदर्शन अनिता शिंगणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यजीत खरात, छगन खंदारे, प्रसाद कुलकर्णी, गणेश सानप, अनिल पवार, गजानन फड, प्रकाश मेहेत्रे, अशोक मेहेत्रे, अनंता खेकाळे, रामेश्वर घाटोळकर, विनोद झोरे, दिलीप काळे, मनोज घटोलकर, गजानन आघाव, समाधान वाघ आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...