आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुय्यम निबंधक कार्यालय नगर परिषद कार्यालय चिखली येथे भाडे तत्वावर सुरु होते. न.प. ची इमारत ही जीर्ण झालेली असून कधीही अनुचित प्रकार घडू शकतो. तरीही दुय्यम निबंधक कार्यालय न. प. जागेतच ठेवण्यासाठी काही जण स्वहितासाठी जनसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचे कुटील कारस्थान रचत आहेत. ते हाणून पाडावे, अशी मागणी चिखली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमुद केले की, दुय्यम निबंधक कार्यालयाची जागा अपुरी असल्याने तेथे नेहमी गर्दी होत असते. या गर्दीत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उलट पाटबंधारे विभागाच्या परिसरात दुय्यम निबंधक कार्यालय असल्यास तेथे ऐसपैस जागा आहे. वृक्षांची सावली आहे. लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. दुय्यम निबंधक कार्यालय हे पाटबंधारे विभागातच कायमस्वरुपी ठेवण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत अाहे.
तसेच मागणी पुर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रा. काँ. विभागीय महिला अध्यक्षा ज्योती खेडेकर, चिखली विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष दीपक म्हस्के, शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, राम खेडेकर, रहिम पठाण, निमराव देशमुख, प्रमोद चिंचोले, सदानंद मोरगंजे, प्रशांत डोंगरदिवे, तुकाराम सोळंकी, मलीक सौदागर, रामकिसन जाधव, सागर खरात, प्रतापसिंग पवार, नसीर कुरेशी, कल्पना केजकरआदींनी दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.