आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संकटांना सामोरे जाण्यासाठी आत्मभान जागृत ठेवा; प्रा. कड यांचे प्रतिपादन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी संकटांना न घाबरता त्याला सामोरे जाण्यासाठी आत्मभान जागृत ठेवावा, असे प्रतिपादन पुणे येथील स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीचे प्रा. गणेश कड यांनी केले. येथील जिजामाता महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त तसेच माजी राष्ट्रपती भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कॅप्टन प्रशांत कोठे हे होते.

तर प्रमुख पाहुणे प्रा. गणेश कड तसेच सत्कार मूर्ती डॉ.श्रीराम येरणकर कला शाखाप्रमुख, डॉ.एम डी जाधव तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, डॉ. वंदना काकडे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. सुरेश गवई वाणिज्य शाखा प्रमुख, आयक्यूएसी समन्वयक सुबोध चिंचोले उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.श्रीराम येरणकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवर तसेच विद्यार्थ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच तत्त्वज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. डी. जाधव यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी बहाल झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.वंदना काकडे शास्त्र विभाग प्रमुख व डॉ.सुरेश गवई वाणिज्य विभाग प्रमुख यांची प्रोफेसर पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैष्णवी रिंढे या विद्यार्थिनीने गुरुवंदना सादर केली. त्यानंतर अक्षय तायडे, तिलक तोंडीलायता, चंचल दहातोंडे, अंकिता सोनुने यांनी शिक्षकांबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी डॉ येरनकर, डॉ. जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य डॉ.कॅप्टन प्रशांत कोठे यांनी अतिशय मार्मिक शब्दांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अतुट नात्यांसंबंधी अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवन ठाकरे यांनी तर प्रास्ताविक प्रा गजानन लोहटे व आभार प्रदर्शन प्रा.सुबोध चिंचोले यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रा. शालिनी निमजे, डॉ. भरत जाधव, डॉ. एन. डब्ल्यू ढाले, प्रा.गजानन देशमुख, प्रा.नितीन पाटील, डॉ. गणेश आंधळे, प्रा सरिता भाकरे, डॉ. राजश्री येवले, डॉ. विकास पहुरकर, प्रा. अनंत मोरे, डॉ. प्रदीप वाघ, डॉ. आनंद देशपांडे, डॉ. राहुल उके यांच्यासह शिक्षक, अनेक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ऋषिकेश सुरडकर, स्नेहल चव्हाण, आरती कुमावत, पूजा कुमावत, स्नेहा परसे, प्रथमेश काळे, किशन दर्डा यांनी विशेष सहकार्य केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...