आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:समृद्धी महामार्गाच्या कामावरुन परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला, पावसामुळे बंद झाले होते काम;13 मृत्यू, 3 गंभीर जखमी

सिंदखेडराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातात मृत्युमूखी पडलेले सर्व जण मध्यप्रदेशातील

बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळील तढेगावमध्ये मोठा अपघात झाले आहे. सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावरील तढेगाव फाट्यावर हा अपघात घडला आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारे ट्रक तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उटल्याने हा अपघात घडला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 लोक ठार झाले असून 3 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना आज दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे.

किनगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून गंभीर जखमींना जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर यातील तीन रुग्णांवर सिंदखेडराजा येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरु आहे.

अशी घडली घटना?
सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावर बसला साईड देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला ट्रक (क्र. एम.एच. 11 सीएच 3728) पावसामुळे रस्ता खचून कलंडला व अपघाताने रस्त्याच्या खाली पूर्णपणे उलटला. त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात लोखंडी बारवर बसलेले 16 जण त्याखाली दबले गेले. दरम्यान, या दुर्घटनेत 13 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती किनगाव राजा पोलिसांनी दिेली आहे.

अपघातातील लोकांचा बचाव करताना स्थानिक लोक
अपघातातील लोकांचा बचाव करताना स्थानिक लोक

समृद्धी महामार्गावरील कामावरुन परतताना काळाने या मजुरांवर घाला घातला. यामध्ये 16 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथून आलेले होते. यामध्ये वाचलेल्या तिघांमध्ये एका पाचवर्षीय मुलीचा समावेश आहे.

अपघातात मृत्युमूखी पडलेले सर्व जण मध्यप्रदेशातील
गणेश डावर (20) मेलखेडी जि.खरगोण

गोविंद शिलोड (25) भोंडल जि.धार

नारायण डावर (25) मेलखेडी जि.खरगोण

करणं मकवणे (19) काकलपूर जि.धार

दीपक डावर (21) मेलखेडी जि.खरगोण

सुनील डावर (22) मेलखेडी जि.खरगोण

दिनेश गावड (२७) हनुमत्या जि.धार

जितेंन मकवणी (19) मकशी जि.खरगोण

दिलीप कटारे (25) अंबापूर जि.धार

मिथुन माचारे (19) तारापूर जि.धार

लष्मण डावर (20) मोहिदा जि.खरगोण

महेश कटारे (31) बाबलाई जि.खरगोण

देवराम ओसरे (21) कचिकुवा जि.खरगोण

तढेगाव फाट्याजवळ झालेल्या अपघाताबाबत एमएसआरडीसीने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अपघातात ज्या 13 मजूरांचा मृत्यू झाला. त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दु:खात महामंडळ सहभागी आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
तढेगाव फाट्याजवळ झालेल्या अपघाताबाबत एमएसआरडीसीने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अपघातात ज्या 13 मजूरांचा मृत्यू झाला. त्यांच्या शोकाकुल कुटुंबियांच्या दु:खात महामंडळ सहभागी आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...