आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी; हिंदी मराठी पत्रकार संघाची मागणी

मलकापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज बुधवारी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर हे मोठी बाजारपेठ व रेल्वे स्थानक असलेले शहर आहे. त्यामुळे या शहरात जिल्ह्यातील नागरिकांचे येणे जाणे दररोज सुरू असते. त्यामुळे शहरात अनेक गुन्हे घडत असतात. अशा घटनांचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना स्वताच्या घरी बसावे लागते. शिवाय काही राजकीय पक्ष पत्रकार परिषद घेतात. परतु त्यांना सुध्दा पत्रकार परिषद घेण्यासाठी उपयुक्त जागा नसल्यामुळे ते कोठेही बोलावून पत्रकार परिषद घेतात. त्यामुळे पत्रकारांना त्रास सहन करावा लागत आहे.

या त्रासातून मुक्तता करण्यासाठी पत्रकारांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आज हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देताना हिंदी मराठी पत्रकार संघाच्या धनश्री काटीकर, श्रीकृष्ण तायडे, गौरव खरे, अजय टप, उल्हास शेगोकार, कृष्णा मेसरे, स्वप्निल आकोटकर, अनिल गोठी, श्रीकृष्ण भगत, संदीप सावजी, विनायक तळेकर, बलराम बावस्कर, दीपक इटनारे, नथूजी हिवराले, नागेश सुरंगे, करणसिंग सिरसवाल, प्रा प्रकाश थाटे, प्रमोद हिवराळे, धरमेशसिंह राजपूत, अनिल झनके, सय्यद ताहेर, योगेश सोनवणे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...