आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूर पांग्रात पेट्रोल पंपावर दरोडा:साडे पाच लाखांची रोकड केली लंपास; आरोपी सीसीटीव्हीत कैद, पोलिस तपास सुरू

बुलढाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी तब्बल साडेपाच लाखांची रोकड लंपास केली आहे. तर दुसऱ्या पेट्रोल पंपावर दरोड्याच्या उद्देशाने गेले असता झालेल्या हातापायीमध्ये दरोडेखोरांनी कार सोडत पळ काढला आहे.

यावेळी झालेल्या झटापटीमध्ये पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी आणि एक दरोडेखोर जखमी झाले. मलकापूर पांग्रा ​​​​​​येथील ​श्रीयान पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्यानंतर हे दरोडेखोर सुलतानपूर येथील कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्दे​​​​​​​​​​​​​​शाने गेले होते. पण तिथल्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांची पळता भूई थोडी झाली. कालिका पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांची गाडी फोडली.

नेमकी घटना काय?

साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मलकापूर पांग्रा येथील पंकज भालेराव यांच्या श्रीयान पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान वॅगनार गाडीतून आलेल्या चार दरोडेखोरांनी पेट्रोल भरण्याचा बहाणा करून केबिनमध्ये प्रवेश केला. दरम्यान आत झोपलेल्या कर्मचाऱ्यांना टामी आणि पान्याने जबर मारहाण करून केबिनमध्ये असलेले साडेपाच लाख रुपये लुटून नेल्याची घटना दि 20 नोव्हेंबरच्या रात्री साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली.

दरम्यान सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळतात साखरखेर्डा, किनगाव राजा आणि बीबी पोलिस घटनास्थळी येऊन दाखल झाले. आरोपी दरोडा टाकताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी मलकापूर पांग्रा पेट्रोल पंप लुटल्यानंतर ते सुलतानपूर येथील कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकत असताना तेथील कर्मचारी आणि दरोडेखारात झटपट झाली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करताच दरोडेखोर घटनास्थळीच गाडी सोडून पसार झाले, या झटापटीत एक दरोडेखर देखील जखमी झाल्याची माहिती पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे म्हणाले की, मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर रात्री दरोडा टाकणाऱ्या दरोडेखांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरू असून लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल.

​​​​​​​
पेट्रोल पंपावरील 10 लाखांची कॅश वाचली

पेट्रोल पंपावर आलेली रोख दररोज बँकेत जमा करण्यात येते. मात्र लग्न असल्याने पंपाचे मालक पंकज भालेराव आणि त्यांचे भाऊ सचिन भालेराव हे लग्नासाठी बुलढाणा येथे गेले होते. त्यामुळे त्यांनी दुपारी दहा लाखाची कॅश घरी नेली होती. लग्नाला तिकडे उशीर झाल्यामुळे रात्री त्यांनी रोख रक्कम घरी घेऊन गेले नाही. ती पेट्रोल पंपावर असताना दरोडेखोरांनी डाव साधला. पंपावर असलेले सुमारे साडेपाच लाख रुपये लुटून नेले.

बातम्या आणखी आहेत...