आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांची मागणी:मलकापूर ते तळणी बस पूर्ववत सुरु करण्यात यावी ; ठरावासह तळणी येथील ग्रामस्थांची मागणी

मलकापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तळणी बस सेवा बंद पडली होती. त्यामुळे नागरिकांना जास्तीचे भाडे देवून खासगी वाहनाने ये-जा करावी लागत आहे. त्यातच आता येत्या काही दिवसांत शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी प्रवासाची सोय व्हावी, यासाठी मलकापूर ते शेलापूर मार्गे तळणी बस सुरू करावी, अशी मागणी ग्रामपंचायत ठरावासह आगार प्रमुख दराडे यांच्याकडे आज १५ जून रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. शेतकरी व शेती कामाला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह इतर नागरिकांना विविध कामासाठी मलकापूरला जावे लागते. परंतु बऱ्याच लोकांकडे वाहनांची सोय नाही. त्यामुळे त्यांना नाइलाजाने खासगी वाहनाने जावे लागते. खासगी वाहन सुद्धा वेळेवर भेटत नाही. शिवाय भाड्याचे अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची हेळसांड थांबवण्यासाठी मलकापूर ते तळणी एस.टी. बस सुरु करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर सरपंच वत्सला शेषराव बोदडे, उपसरपंच जयश्री प्रवीण नारखेडे, किसान सेना मोताळा तालुकाप्रमुख संजय नारखेडे, संदीप झोपे, उद्धव नाफडे, प्रमिला नारखेडे, सदाशिव खर्चे, स्नेहल नारखेडे, सोपान खराटे, संजय तायडे, सूरज वाघोदे, गजानन नाफडे पत्रकार गणेश वाघ यांच्या सह्या आहेत. यावेळी आगार प्रमुखांनी लवकरच बस सुरु करू, असे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...