आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कार्तिक लळीत उत्सवाने मंडप व दीपोत्सवाची सांगता

देऊळगाव राजा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या व शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या कार्तिक लळीत उत्सवाने मंडप उत्सव व दीपोत्सवाची सांगता १९ नोव्हेंबर रोजी ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिर येथे करण्यात आली. चातुर्मास भजनाची समाप्ती करण्यात आली.

१९ नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता हभप हरिदास महाराज यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर ठीक पाच वाजून ४५ मिनिटानी दहीहंडी फोडून श्री मंदिरासमोरील मंडपाची दूर सोडून ललित उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर श्रींच्या मंदिरात गुलालाची उधळण करून महाआरती व प्रसादाचे भाविकांना वितरण करण्यात आले.

अश्विन आणि कार्तिक उत्सवात सहकार्य करणाऱ्या सर्व मानकरी, सेवेकरी, ब्राह्मण व पुजारी वृंद, यात्रा उत्सव समितीचे सदस्य, यात्रेत आलेले विविध व्यापारी, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, विद्युत महामंडळ, बॅक कर्मचारी, विवीध प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, अन्नदाते सेवेकरी, पत्रकार आदींचे श्री संस्थानच्या वतीने श्री बालाजी महाराज संस्थांचे वंशपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व व्यवस्थापक नंदकिशोर बीडकर तसेच श्री बालाजी यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण अहिरे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा, तहसीलदार श्याम धनमने, मुख्याधिकारी अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी उत्सव काळात सहकार्य केल्याबद्दल बालाजी भक्तांचे अभिनंदन तथा आभार व्यक्त केले.

विविध कार्यक्रम उत्साहात
शहराचे ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या कार्तिक उत्सवाची सुरुवात ही कार्तिक दशमीपासून करण्यात आली. या उत्सवात श्री मंदिरासमोर श्री बालाजी महाराज व पद्मावती विवाह सोहळया निमित्त मंडप आच्छादन केले होते. या उत्सवात दीपोत्सव विविध फुलांचे मखर चप्पल दोघांचा नैवेद्य आणि ब्राम्हण वृंदाची अनुष्ठान समाप्ती असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...