आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ॥ पंढरीचा वारकरी । वारी चुको न दे हरी ॥ संत संग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्होळ॥ चंद्रभागे स्नान। तुका मागे हे ची दान ॥ या अमृतवाणी प्रमाणे च श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारी पूर्ण करून बुधवारी शेगावात दाखल झाली. सुमारे ५५४ किलोमीटरचा प्रवास करत श्रींची पालखीने २२ दिवसांत पार केले.
भाविक-भक्तांच्या प्रेमाचा व स्वागताचा स्वीकार करत उत्साही भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामा चा नाम जप करीत जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते मंत्राचा नाम जप व टाळ मृदंगांच्या गजर श्रींची पालखीत जाणवत होता. खामगाव येथून निघालेल्या या पालखीत जिल्हयातील दीड लाख भाविक सहभागी झाल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसून येत होती. जिल्ह्यातून व ठिकठिकाणाहून आलेल्या लाखो भाविकांमुळे संतनगरीचे वातावरण भक्तिमय झाले होते. या वारीत युवकांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. श्री गजानन महाराज वाटिका येथे श्रींच्या पालखीचे सेवाधारी विश्वस्त यांच्या हस्ते पूजन करुन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले व दुपारच्या मुक्काम नंतर श्रींची पालखीने मंदिराकडे प्रस्थान केले. शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करत श्रींची पालखी मंदिरात पोहोचली. यावेळी पावसाच्या हलक्या सरीने संत नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
आकर्षक रिंगण सोहळा : श्रींच्या पालखीची नगर परिक्रमासाठी दुपारी १ वाजता वाटिका येथून सुरुवात झाली. सायंकाळी श्रींच्या मंदिरात भक्तांच्या उपस्थितीत वारकऱ्यांचा टाळ मृदंगांच्या तालावर श्रींचा नामघोष विठ्ठल व ज्ञानोबा तुकाराम नामाचा नामघोष करीत पालखीचे स्वागत होवून सायंकाळी श्रींच्या मंदिरात पालखी सोहळा पोहोचला. महाआरती होऊन सोहळ्याची सांगता झाली.पालखीचे आगमनानिमित्त शहरात ३०० पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील चौकाचौकात पोलिस तैनात केले होते.
शेगाव झाले पंढरपूर
शेगाव नगरीत आगमन झाल्यानंतर पालखीचा श्री ग. म. वाटीका येथे दुपारचा विसावा नंतर पालखीचे जगदंबा चौक, एमएसईबी चौक, रेल्वेस्टेशन, श्री अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री लहुजी वस्ताद चौकातून, श्री मंदिर परिसरात आगमन झाले. सर्वत्र भाविकांची मांदियाळी दिसत होती. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पंढरपूर अवतरल्याचा भास होत होता.
१ लाख २० हजार भाविकांना प्रसाद
श्रींची पालखी आज संत नगरीत दाखल होणार असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक शहरात दाखल झाले होते. या भाविकांना श्री संस्थेद्वारे श्री गजानन महाराज वाटिका येथे ५० हजारांच्या वर तर श्री मंदिरामध्ये ७० हजारांच्या वर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.